Posts

सणकी लेखकाची डायरी ४ श्रीधर तिळवे नाईक सणकी लेखकाची डायरी ४ श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी ४ श्रीधर तिळवे नाईक चैत्र प्रथमा माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही माझ्या समकालीन लेखकांशी कधीही कसलीही स्पर्धा केली नाही किंबहुना समकालीन काळातल्या मला ठाऊक नसलेल्या आणि माझ्या शरीराचा ज्यांच्याशी संपर्क आला नाही अश्या अनेक गोष्टींचा साक्षात अनुभव व्यक्त करण्याऱ्या माझ्याच शरीराचे विस्ताररूप असण्याऱ्या मितिकांचा सजीव चैतन्यमयी समूह म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहत आलेलो आहे मी आणि ते ह्यांच्यात अद्वैत आहे हा माझा अनुभव आहे आम्ही एका समान कालखंडाला सामोरे जात आहोत आणि आमची खरी स्पर्धा ह्या कालखंडाशी आहे त्यातल्या सर्व गोष्टी आम्ही चिन्हसृष्टीत ओतू शकतो का हा खरा प्रश्न आहे चिन्हसृष्टी हे आमचे तोंड आहे आणि आम्ही ह्या तोंडांच्या साहाय्याने आमचा काळखंड गिळतो आहोत काळ अनंत अवकाशक्षणांनी येतो आणि माझ्या शरीराला त्यातील फक्त एक अवकाशक्षण येतो ह्या अवकाशक्षणातील काहींच्या कविता होतात कांदंबऱ्या होतात . जितके लोक तितके अवकाशक्षण ! अब्जावधी ! आणि प्रत्येक क्षणी त्यातील फक्त एक अवकाशक्षण माझा !एक सचिन केतकरांचा ! एक सलील वाघाचा !एक अभिजित देशपांडेचा  ! एक मनोज जोशींचा ! एक नित
सणकी लेखकाची डायरी ३ श्रीधर तिळवे नाईक चैत्र प्रथमा आपण स्वतःला थोर समजतो पुढे बोला 
सनकी लेखकाची डायरी २ श्रीधर तिळवे नाईक चैत्र प्रथमा ग्रेस बोलतांना पाहणे हा एक भयंकर अनुभव आहे . लोक ह्याला का झेलतात कुणास ठाऊक ? साहित्यातल्या बुवाबाजीचा चालता बोलता नमुना 
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक चैत्र प्रथमा तुम्ही मला कितीही सांगितलं तरी मी स्पॅनिश किंवा पोर्तुगीज कादंबरीकारासारखं लिहिणार नाही माझा आदर्श रामायण आणि महाभारत आहे अगदी त्यांना मोडीत जरी काढायचं असलं तरी मी त्यांच्याच पोटात जाऊन त्यांना मोडीत काढणार मी भारतीय कादंबरीचं लिहिणार माझी कल्पनाशक्ती भारतीय आहे म्हणा ना उदयप्रकाश तुम्हाला आवडत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही मला मार्क्वेझ वगैरे फालतू वाटतात . तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचा माझी अडाहॉका त्यामुळेच फालतू झालीये ? असेल बुवा . जा स्पॅनिश लेखक वाचा . सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक चैत्र द्वितीया राज्य ही मुळात एक श्रद्धा आहे . काही विशिष्ट कल्पनेवर आधारलेली श्रद्धा . ह्या श्रद्धेमागे कसलेही तर्कशास्त्र नाही . तिला कसलाही वैज्ञानिक आधार नाही . ते मुळीच नैसर्गिक नाही मात्र ते टोळी ह्या नैसर्गिक वास्तवाचा काल्पनिक विस्तार आहे . राष्ट्र हा  राज्य ह्या श्रद्धेचा आधुनिक काल्पनिक विस्तार आहे त्याला वैज्ञानिक सत्याचा आधार असणे आवश्यक आहे पण तो घेतलाच पाहिजे अशी सक्ती नाही त्यामुळे धर्म नावाच्या श्रद्धेच्या